• Mon. Oct 27th, 2025

बीएसएनएल मध्ये विविध उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

ByMirror

Apr 15, 2024

बाबासाहेबांच्या जीवनावर रंगली प्रश्‍नमंजुषा स्पर्धा

ज्यांना शाळेत शिकू दिले नाही, त्यांनी देशाचे संविधान लिहिले -प्रदीपकुमार जाधव

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बीएसएनएल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी बुध्द वंदना घेऊन डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला बीएसएनएलचे उपमहाप्रबंधक विश्‍वनाथ वाघ व सेवा असोसिएशनचे मुख्य सल्लागार प्रदीपकुमार जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


या कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक प्रबंधक चौरे, पिंपरकर, झोळे, गजेंद्र पिसे, विजय शिपनकर, गणेश जोशी, मिनल गुणे, समीर मल्लेभारी, महेश पवार, कवयित्री तथा शिर्डी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा महेश पवार, शिल्पा जावळे आदींसह बीएसएनएलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


प्रदीपकुमार जाधव म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांना शालेय जीवनापासून बॅरिस्टर होण्यापर्यंत व संविधानाची रचना करे पर्यंत अनेक अपमान, हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या. पण संविधानात बदल्याची भावना आजीबात दिसत नाही. सर्व जाती-धर्माला न्याय बंधुता आणि समानता त्यांनी बहाल केली. त्यांना बैलगाडीवाल्याने गाडीत बसू दिले नाही, पण बाबासाहेबांनी नंतर विमानाने प्रवास केला. त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यांना शाळेत शिकू दिले नाही, मात्र त्यांनी संघर्षाने उच्च शिक्षित होवून भारताचे संविधान लिहिले हे या महामानवाची महानता असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनावर भाषण केले. तसेच बाबासाहेबांच्या जीवनावर प्रश्‍नमंजुषेची स्पर्धा रंगली होती. यामधील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. मुख्याध्यापिका सुलभा महेश पवार यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पिसे यांनी केले. आभार प्रशासकिय अधिकारी राहुल मोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *