• Mon. Jul 21st, 2025

वीरशैव कक्कय्या ढोर समाज विकास मंडळाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

ByMirror

Apr 15, 2024

हजारो वर्षापासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाचा बाबासाहेबांनी उध्दार केला -रमेश त्रिमुखे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वीरशैव कक्कय्या ढोर समाज विकास मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश त्रिमुखे, समाजातील ज्येष्ठ नागरिक गंगाधर त्र्यंबके, उपाध्यक्ष बाबासाहेब त्रिंबके, खजिनदार किशोर भालशंकर, सहसचिव गणेश नारायणे, सदस्य अनिल त्रिमुखे, संजय खरटमल, पिंटू कोकणे, प्रशांत डहाके, सुरेंद्र बोराडे आदी उपस्थित होते.


रमेश त्रिमुखे म्हणाले की, हजारो वर्षापासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाला बाबासाहेबांनी जागृक करुन त्यांचा उध्दार केला. जातीय उतरंडी नष्ट करण्यासाठी त्यांनी खरा माणुसकी धर्म शिकवला. धर्मातील भेदभाव, अस्पृश्‍यता, उच्चनिचता संपवून त्यांनी दीन-दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समता व बंधुत्वतेवर आधारलेल्या समाज निर्मितीसाठी बाबासाहेबांनी योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *