अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील डॉ. शुभम खिंवसरा यांचे देशातील नावाजलेल्या अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट चेन्नई येथे डीएम ऑन्कोलॉजिस्टच्या (कॅन्सर तज्ञ) अभ्यासासाठी निवड झाली आहे. खिंवसरा हे एमबीबीएस एमडी मेडिसीन असून, प्रथमच डीएम ऑन्कोलॉजिस्ट होणारे शहरातील डॉक्टर ठरणार आहे.
डॉ. खिंवसरा हे माळीवाडा येथील गुरुदेव डेंटल क्लिनिकचे संचालक आहे. डॉ. स्वप्नील खिंवसरा व डॉ. स्विटी खिंवसरा यांचे ते धाकटे बंधू आहेत. डीएम ऑन्कोलॉजिस्ट अभ्यासासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.