• Mon. Oct 27th, 2025

केडगाव मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ByMirror

Apr 17, 2024

फुलांच्या सजावटीने वेधले लक्ष

वंचित समाजाला बाबासाहेबांनी जागृक करुन त्यांचा उध्दार केला -सचिन (आबा) कोतकर

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक उपक्रमासह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती करण्यात आलेल्या आकर्षक फुलांच्या सजावटीने सर्वांचे लक्ष वेधले.


केडगाव ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राहुल कांबळे, गणेश ननावरे, सुनील (मामा) कोतकर, सुनील उमाप, सुरज शेळके, अशोक कराळे, चेअरमन अनिल ठुबे, महेश गुंड, गणेश आनंदकर, उमेश कोतकर, भूषण गुंड, संदीप पगारे, सोनू घेंबुड, सुभाष कांबळे, सुनील कांबळे, केतन कांबळे, प्रवीण घोलप, स्वप्निल कांबळे, जाकी काकडे, शशिकांत कांबळे, सागर पगारे, सनी पाचारणे, संतोष साळवे, बबलू कांबळे, बंटी कांबळे, रुपेश कांबळे, राजकुमार पाचारणे, अक्षय पाचरणे आदींसह युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सचिन (आबा) कोतकर म्हणाले की, हजारो वर्षापासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाला बाबासाहेबांनी जागृक करुन त्यांचा उध्दार केला. बाबासाहेबांनी धम्मक्रांतीतून खरा माणुसकी धर्म शिकवला. धर्मातील भेदभाव, उच्चनिचता संपवून त्यांनी दीन-दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.


राहुल कांबळे म्हणाले की, भारतीय लोकांना समता बंधुता मिळवून देणारी राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. राज्यघटनेमुळे देशात समता, बंधुता नांदत आहे. बाबासाहेबांनी अन्याया विरोधात दिलेला लढा कायम स्फूर्ती देणारा आहे. त्यांच्या विचाराने समाजाला दिशा मिळणार असून, त्यांचे विचार म्हणजे क्रांतीची जननी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महेश गुंड यांनी तत्कालीन व्यवस्थेविरोधात संघर्ष करून बाबासाहेबांनी दीन-दलितांचा उद्धार केल्याचे सांगितले. सुनील (मामा) कोतकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून व वाचून साजरी होत आहे. जातिव्यवस्थेने बरबटलेल्या काळोखात बाबासाहेबांनी समाजाला प्रकाशवाट दाखवली असून, आजही त्यांचे विचार दिशादर्शक असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *