16 एप्रिलला मिरवणुकीचे आयोजन
नगर (प्रतिनिधी)- घटनापती प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
नेवासा फाटा येथे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवीभाऊ भालेराव यांच्या संकल्पनेतून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास मुकींदपूरचे सरपंच सतिषदादा निपुंगे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे तसेच दत्ता काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी दत्ता काळे, अमोल पठाडे, विकी कांबळे, निखिल चंदानी, पप्पू सोनकांबळे, जयदेव जमधडे, संदीप साळवे, शिवा साठे, कपिल बांगर, इरफान शेख, सचिन क्षीरसागर, तुषार बोरुडे, रवी शेरे, उमेश इंगळे, प्रतीक वाल्हेकर, साहिल शेख, विजय कांबळे, आकाश ठोकळ, सिमोन दौंडे, विक्रम साठे, महेश साठे, विकी साळवे, प्रथमेश साठे, सुरज साठे, प्रतीक कांबळे, शरद साठे, पप्पू साळवे, वक्रतुंड, विश्वास साळवे, समाधान सोनकांबळे, प्रणव साठे, अमोल शिरसाट, सनी साठे, सागर साठे, आदेश कांबळे, देविदास मगर, आदेश कांबळे, देविदास मगर, अमोल घुले आदींसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंतीनिमित्त सर्वत्र निळे झेंड्यांनी परिसर व्यापले होते. तर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
–—
16 एप्रिल रोजी मिरवणूकीचे आयोजन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने संस्थापक अध्यक्ष रवीभाऊ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली घटनापती सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून बुधवारी (दि. 16 एप्रिल) सायंकाळी 7 वाजता मुकिंदपूर (काळेगाव) येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तालुक्यातील आंबेडकर प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे दत्ता काळे यांनी केले आहे.