पेन्शन, शिष्यवृत्ती व घरकुलासह विविध मागण्यांसाठी वेधणार शासनाचे लक्ष
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बांधकाम क्षेत्रातील कामगारांना पेन्शन, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ तात्काळ मिळावा, यासाठी लोकशाही बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कर्जत येथे जिल्हाव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. येत्या 8 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कर्जत तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष शंकर भैलुमे यांनी दिली.
संघटनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून घेतले जाणारे अनेक निर्णय हे कामगारांच्या हिताचे नसून जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करणारे आहेत. त्यामुळे कामगारांना योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येत आहेत.
महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांना तात्काळ पेन्शन योजना लागू करावी, कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मागितली जाणारी अतिरिक्त कागदपत्रांची अट रद्द करावी, आवश्यक वस्तू संच वितरणात होत असलेली अनियमितता व फसवणूक तात्काळ थांबवावी, सर्व पात्र कामगारांना घरकुल योजना तातडीने मंजूर करावी, भविष्यात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास प्रत्येक कामगाराला किमान 10 हजार रुपयांची मदत देण्याचा शासन निर्णय (GR) काढावा, भांडी व अत्यावश्यक वस्तू संचांचे तालुका स्तरावर ऑनलाइन वितरण सुरू करावे, इतर राज्यांच्या धर्तीवर कामगारांच्या मुलांना लॅपटॉप योजना लागू करावी, मृत बांधकाम कामगारांचे प्रलंबित अर्ज तात्काळ मंजूर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
या आंदोलनासाठी पुनम समुद्र, शालन मोहिरे, सुनिता अवचर, आशा माने, स्वप्नील जाधव, नमिता गुंड, स्वाती शिंदे, मिरा पारसे, गीतांजली अडसुळ, अशोक डांडर, रानी साळवे, आरमा शेख, समिना सय्यद, शाईन शेख, सानिया झारेकरी, दत्तात्रय लांडगे, कानिलाल भिसे, छाया सांगळे, वानू शेख, भाग्यश्री शिंदे, अब्बास तांबोळी, सुनिल जाधव, रमेश बरकटे, योगेश चव्हाण, सविता आरने, अमृत काळे, केशव दातीर, यास्मिन बागवान, चंद्रकांत चव्हाण, राजूभाई तांबोळी, शिल्पा म्हस्के, शवाना बागवान, फारुक शेख, वंदत्ता समुद्र, सारिका घोडके, राणी पिटेकर, कल्याणी थोरात, नितीन अवचार, अभिमन्यू पिटेकर, अनुप भैलुमे आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
