दिव्यांगांना सहकार्य करुन त्यांचे विविध प्रश्न सोडविण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी पुन्हा पदभार घेतल्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तर दिव्यांगांना सहकार्य करुन त्यांचे विविध प्रश्न सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे, विजय हजारे, राजेंद्र पोकळे, गीतांजली कासार, वसंत शिंदे आदी उपस्थित होते.
ॲड. लक्ष्मण पोकळे म्हणाले की, डॉ. संजय घोगरे यांनी यापूर्वी देखील उत्तम प्रकारे जिल्हा रुग्णालयाचे काम पाहिले आहे. दिव्यांगांना अपंगाचे दाखले वेळेत मिळण्यासाठी त्यांनी सहकार्य केले. सध्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन व नोंदणीसाठी दिव्यांग बांधव संपूर्ण जिल्ह्यातून येत असून, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांच्याकडून निश्चितच सहकार्य होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.