• Wed. Feb 5th, 2025

शहरात 2 फेब्रुवारीला जिल्हास्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेचे आयोजन

ByMirror

Jan 20, 2025

जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आलेली जिल्हास्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धा 2 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी क्रीडा भवन येथे होणार आहे. यामध्ये खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे प्रा.आर.पी. डागवाले, प्रा. सुनील जाधव, दिनेश भालेराव व राजेंद्र कोतकर यांनी केले आहे.


ही मैदानी स्पर्धा 8, 10, 12 व 14 वर्ष वयोगटातील मुला-मुली मध्ये रंगणार आहे. सकाळी 9.30 वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार असून, यामधील प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंना गुणवत्ता प्रमाणपत्र व मेडल दिले जाणार आहे. तर सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र मिळणार आहे. 8, 10, 12 व 14 वयोगटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. हे खेळाडू अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून, ही स्पर्धा 21 फेब्रुवारी रोजी पंढरपूर (जि. सोलापूर) येथे होणार आहे.


सर्व खेळाडूंनी ऑनलाईन पद्धतीने https://www.smrsports.in/athletic/registration/1737102217fjYrjBVd89bdWNQybTjzRlpkusiWoo7D या संकेत स्थळावर किंवा क्यूआर कोड स्कॅन करुन अर्ज भरुन प्रवेशिका जमा करता येणार आहे. प्रवेशिका जमा करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी आहे. स्पर्धेला येताना मुळ जन्म दाखला व आधार कार्ड सोबत घेऊन येण्याचे सांगण्यात आले आहे. ही स्पर्धा फक्त अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आहे जिल्ह्याच्या बाहेरील खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *