खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन वतीने जाहीर करण्यात आलेली जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (ॲथलेटिक्स) मैदानी स्पर्धा 18 जानेवारी 2026 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी क्रीडा भवन येथे होणार आहे. यामध्ये खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे प्रा.आर.पी. डागवाले, प्रा. सुनील जाधव, दिनेश भालेराव व राजेंद्र कोतकर यांनी केले आहे.
ही स्पर्धा 8, 10, 12 व 14 वर्ष वयोगटातील मुला-मुली मध्ये मैदानी स्पर्धा रंगणार आहे. सकाळी 10.00 वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार असून, यामधील प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंना गुणवत्ता प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तर सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र मिळणार आहे. 8, 10, 12 व 14 वयोगटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. हे खेळाडू आहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून, ही स्पर्धा 7 व 8 फेब्रुवारी रोजी कोपरगाव अहिल्यानगर येथे होणार आहे.
सर्व खेळाडूंनी https://register.smrsports.com/Competition/Ahmednagar_District_Sub_Junior_Athletics_Meet_2025 या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका जमा करावी. प्रवेशिका जमा करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी आहे. स्पर्धेला येताना मुळ जन्म दाखला व आधार कार्ड सोबत घेऊन येण्याचे सांगण्यात आले आहे. ही स्पर्धा फक्त अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी असून, जिल्ह्याच्या बाहेरील खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
