• Thu. Oct 30th, 2025

वाहन चालवताय वृक्षरोपणही करा!

ByMirror

Jun 6, 2024

वासन टोयोटा शोरुमच्या वतीने कार ग्राहकांना रोपांचे वाटप; जागतिक पर्यावरण दिनाचा उपक्रम

वसुंधरा संवर्धनेचा वसा वृक्षरोपणाने जपला जाणार -विजय वासन

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कार ग्राहकांना रोपांचे वितरण करुन वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, नगर-पुणे रोड येथील वासन टोयोटा शोरुममध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हा आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला.


वासन समूहाचे अध्यक्ष विजय वासन व टोयोटा कंपनीचे विभाग प्रमुख व्यवस्थापक आर.एम. प्रशांत यांच्या हस्ते कार ग्राहकांना रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी शोरुमचे संचालक जनक आहुजा, क्षेत्र व्यवस्थापक अमोल भावे, क्षेत्र व्यवस्थापक शुभम रस्तोगी, अतुल सिंघल, हरीश शर्मा, तेजिंदरसिंग बेदी, अनिश आहुजा, अझीम शेख, शेखर नाळेगावकर आदी उपस्थित होते.


विजय वासन म्हणाले की, पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिचे सौंदर्य हिरवाईने फुलविण्याची गरज आहे. वसुंधरा संवर्धनेचा वसा वृक्षरोपणाने जपला जाणार आहे. जंगल तोड झाल्याने पर्यावरणाचे प्रश्‍न निर्माण झाले असून, भविष्याचा विचार करुन वृक्षरोपण व संवर्धन चळवळ काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले.


जनक आहुजा यांनी मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्ष लागवडीमुळे प्रदुषणाचे प्रमाण देखील कमी होणार आहे. मनुष्याला जगण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नाही. ऑक्सीजन देण्याचे काम झाडे करीत असतात, त्यांच्याकडून मिळणाऱ्या ऑक्सीजनरुपी श्‍वासासाठी वृक्षांना जगविणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित कार ग्राहकांनी शोरुमच्या वतीने देण्यात आलेल्या झाडांची लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *