गुरुनानक देवजी सेवा ग्रुपचा उपक्रम
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर येथे गुरुनानक देवजी सेवा ग्रुप (जी.एन.डी.) च्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना खिचडीचे प्रसाद वाटप करण्यात आले. जनक आहुजा यांच्या हस्ते प्रसाद वाटपाला प्रारंभ करण्यात आले.
यावेळी संजय आहुजा, जीतू गंभीर, जय रंगलानी, महेश मध्यान, विकी कंत्रोड, अवतार गुर्ली, बबलू खोसला, बाबा कर्नलसिंग, करन आहुजा आदी उपस्थित होते.

जनक आहुजा म्हणाले की, गुरुनानक देवजी सेवा ग्रुपच्या माध्यमातून विविध सण-उत्सवात प्रसादचे वाटप करण्यात येते. धार्मिक कार्यक्रमाबरोबर रक्तदान, आरोग्य शिबिर, वृक्षरोपण आदी विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली. जय हरी विठ्ठलच्या गजरात भाविकांनी खिचडीचा आस्वाद घेतला.