स्वराज्य प्रतिष्ठान, कामगार संघटना व युवा सेनेचा सामाजिक उपक्रम
वंचित, दुर्लक्षीत घटकातील विद्यार्थ्यांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज -योगेश गलांडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान, स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटना आणि युवा सेनेच्या वतीने भिस्तबाग, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांचा वाढदिवस वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसह साजरा करुन, इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी महेश गलांडे, दीपक परभणे, वसीम शेख, गिरीश जगताप, राम घुगे, अपंग संजीवनी सोसायटीचे चेअरमन मधुकर भावले, मुख्याध्यापक दिलीप जगधने, चैतन्य कोंबडे, अशोक शेळके, सुनील शेवाळे, शंकर शेळके, भरत दिंडे, अवी कर्डिले, नामदेव झेंडे, अमित बारवकर, अजिनाथ शिरसाठ, सागर गलांडे, गौरव पाटोळे, संग्राम राऊत, वैष्णव गलांडे, शिवा गलांडे, अरबाज खान, संतोष दळवी, संतोष शेवाळे, अमोल घुटे, अवी कर्डिले आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मधुकर भावले म्हणाले की, राजकारण व समाजकारण करताना योगेश गलांडे सातत्याने वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम करत आहे. मूकबधिर विद्यालयतील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे नेहमीच सहकार्य लाभत आहे. सर्वसामान्य कामगारांच्या हितासाठी त्यांचा संघर्ष सुरू असून, चळवळीतून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक दिलीप जगधने यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

योगेश गलांडे म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील घटक असलेले दिव्यांग विद्यार्थ्यांकडे समाजाचे दुर्लक्ष होत आहे. वंचित, दुर्लक्षीत घटकातील विद्यार्थ्यांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज असून, आपल्या आनंदात त्यांना समाविष्ट करुन प्रेम देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमीच सहकार्य राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच बोल्हेगाव येथील साई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. गलांडे यांनी कामगार वर्गातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्याचे आश्वासन दिले. शाळेचे संस्थापक आदर्श ढोरस्कर यांनी आभार मानले.