• Mon. Nov 3rd, 2025

बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांच्या मानवसेवा प्रकल्पात मिष्टान्न भोजनाचे वाटप

ByMirror

Sep 16, 2024

जनजागृती मित्र मंडळाचा उपक्रम

समाजापासून दुरावलेल्या वंचितांना पुन्हा माणुस म्हणून उभं करणे प्रत्येकाची जबाबदारी -अनिल शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्ण महिला व बंधूंच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अरणगाव रोड येथील मानवसेवा प्रकल्पात जनजागृती मित्र मंडळाच्या वतीने मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.


शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सामाजिक उपक्रमाप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील लालबोंद्रे, नगरसेवक संजय छजलानी, रविंद्र लालबोंद्रे, उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके, तालुका प्रमुख अजित दळवी, उपशहर प्रमुख सुनील भिंगारदिवे, युवा सेना तालुका प्रमुख सचिन ठोंबरे, सोमनाथ शिंदे, वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे, अमोल कासार, अक्षय शिंदे, रुनिल नागवडे, दादा कांबळे, विनीत झरेकर, गणेश मोकाटे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


अनिल शिंदे म्हणाले की, ज्यांना समाजाने नाकारलं, हेटाळलं त्या निराधार पिडीत मानसिक विकलांगांना आधार देण्याचे कार्य मानवसेवा प्रकल्पात होत आहे. या मानवसेवेच्या कार्यात सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे. समाजापासून दुरावलेल्या वंचितांना पून्हा माणुस म्हणून समाजात उभं करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, युवा सेनेचे शहर प्रमुख महेश लोंढे, श्रीगोंदा तालुकाप्रमुख आशितोष डहाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *