राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पुढाकार
युवकांच्या हाताला काम मिळाल्यास समाजातील प्रमुख प्रश्न सुटणार -इंजि. केतन क्षीरसागर
अहमदनगर (प्रतिनिधी)- बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतंर्गत शहरातील बेरोजगार युवकांना आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांच्या हस्ते व्यावसायिक वाहनांचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, युवती अध्यक्षा अंजली आव्हाड, अविनाश गुंजाळ, राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी ऋषीकेश जगताप, किरण घुले, शिवम कराळे, गौरव हरबा, आशुतोष पानमळकर, मंगेश शिंदे, ओंकार म्हसे,केतन ढवण, कृष्णा शेळके, ओंकार मिसाळ, रोहित सरना, कुणाल ससाणे, मंगेश जोशी, साहिल पवार, तन्वीर मन्यार, रोहन देशपांडे, शुभम चितळकर, ओंकार गोडाळकर, वैभव ससे, संदीप गवळी, ओंकार साळवे, अरबाज शेख आदी उपस्थित होते.
सुरज चव्हाण यांनी व्यवसायातून युवक सक्षम होणार असून, बेरोजगार युवकांना रोजगार निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारचा दिशादर्शक उपक्रम सुरु असल्याचे सांगितले. इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, युवकांच्या हाताला काम मिळाल्यास समाजातील प्रमुख प्रश्न सुटणार आहे. हाताला काम नसल्याने युवकांची निराशा होत आहे. व्यवसायाच्या माध्यमातून युवा वर्गाला काम मिळणार असून, राज्य सरकारची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किशोर थोरात व औदुंबर शिंदे या लाभार्थींना व्यावसायिक वाहनाचे वितरण करण्यात आले. या योजनेत युवकांना व्यावसायिक वाहनासाठी 25 ते 35 टक्के सबसिडी मिळणार आहे. वाहनासाठी फक्त 5 टक्के डाऊनपेमेंट भरायचा असून, याचा व्याजदर देखील कमी आहे. ही योजना युवकांपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून केले जात असल्याची माहिती इंजि. क्षीरसागर यांनी दिली. या उपक्रमासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसला लीन इंडस्ट्रिजचे विशेष सहकार्य लाभले.