पक्षश्रेष्ठींच्या आदेशानेच भैलुमे जिल्हाध्यक्ष -श्रीकांत भालेराव
नवीन जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षातील पदाधिकारी बदलण्याचा अधिकार हा सर्वस्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. आठवले यांच्याकडे आहे. त्यांच्या आदेशानेच दक्षिण जिल्हाध्यक्ष पदात फेरबदल करण्यात आला आहे. घेतला गेलेला निर्णय हा स्वतः एकट्याचा नाही. भैलुमे हेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचे आवाहन संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले 5 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, संगमनेर व अकोले येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनार्थ शासकीय विश्रामगृह येथे भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, जिल्हाध्यक्ष संजय भैलूमे, रिपाई नेते माजी नगरसेवक अजय साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, गौतम घोडके, उपाध्यक्ष सुरेश भागवत, विलास साठे, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, आयटी सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, माजी नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, विशाल कांबळे, युवक शहराध्यक्ष निखिल साळवे, दत्ताभाऊ कदम, मिरजगाव अध्यक्ष नागेश घोडके, आयटी सेल कर्जत अध्यक्ष रमेश आखाडे, चापडगाव शहराध्यक्ष दीपक सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आरतीताई बडेकर, महिला तालुकाध्यक्ष कविताताई नेटके, विनोद भिंगारदिवे, विशाल काकडे, लखन भैलुमे, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक तालुका उपाध्यक्ष विशाल कदम, निखिल सूर्यवंशी, सोन्याबापू सूर्यवंशी, चंद्रकांत भिंगारदिवे, सदाशिव भिंगारदिवे, सुजित घंगाळे, बाळासाहेब नेटके, देवा खरात, नितीन भैलुमे, आकाश बडेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे भालेराव म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर माजी जिल्हाध्यक्षांना दोन महिने वाढ कशासाठी पाहिजे? हे सर्वांच्या लक्षात येत आहे. रिपाई हे मित्र मंडळ नसून, राष्ट्रीय पक्ष आहे. पदाधिकाऱ्यांनी तत्त्वाप्रमाणे वागावे, बालिशपणाने कोणतीही मागणी व आरोप करू नये. भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री ना. आठवले यांच्या दौऱ्यात मोठ्या संख्येने येऊन आपली ताकद दाखविण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुकाध्यक्ष यांचे लेखी पत्राने व सर्वांच्या उपस्थितीत भैलुमे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केला आहे. चुकीचे आरोप करून राजीनामा मागणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो पाळला जाणार असल्याचेही भालेराव यांनी सांगितले.
अमित काळे यांनी नवीन कार्यकारणीत काम करणाऱ्यांना संधी दिली जाणार असून, सक्रीय कार्यकर्त्यांना सभासद नोंदणी करण्याचे सांगितले. अजय साळवे यांनी 14 मार्च रोजी बैठक घेऊन सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे जाहीर केले.
जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे म्हणाले की, तालुकाध्यक्षांनी माजी जिल्हाध्यक्ष विरोधात उठाव करून बदल घडविला आहे. माजी जिल्हाध्यक्षांनी मागील 18 वर्षात कधीही कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही. निवडणुकीत मलिदा लाटण्यासाठी त्यांचा वापर केला, अजूनही त्यांना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन महिन्याची अधिकची जबाबदारी पाहिजे आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम ते करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, मोठ्या चळवळीतून मोठा नेता निर्माण होत असतो. अहमदनगर हा चळवळीचा जिल्हा असून, आंबेडकरी चळवळीतून अनेक दिग्गज व्यक्तीमत्व पुढे आलेले आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांना मोठे करण्याचे काम यापुढे करावे लागणार आहे. चळवळीतून ताकद निर्माण करुन भैलुमे यांच्याबरोबर ताकतीने उभे राहण्याचे त्यांनी सांगितले.
