सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला सन्मान
नगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम विभागातील उपकार्यकारी अभियंता कुंडलिक शेळके यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता उत्तम बोरुडे आणि उपविभागाचे उपअभियंता शशी सुतार यांनी शेळके दांपत्याचा सत्कार केला.
या सेवापूर्तीच्या कार्यक्रमास सेवानिवृत्त उपअभियंता प्रकाश तीपुळे, शाखा अभियंता सतीश शिंदे तसेच विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्तम बोरुडे यांनी शेळके यांची प्रशासकीय कार्य, प्रामाणिकपणा, बांधकामातील काटेकोर अंमलबजावणी व सहकाऱ्यांशी असलेले सौहार्दाचे संबंध याचे विशेष कौतुक केले. तर विभागातील दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून ते सर्वांना सुपरिचत असल्याचे स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना कुंडलिक शेळके यांनी सहकाऱ्यांचे व वरिष्ठांनी केलेल्या सहकार्याने चांगले काम करता आले. विभागातील विविध जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
पुढे त्यांनी आपल्या भावनिक भाषणात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यलय व येथील सर्व सहकारी दुसरे कुटुंब झाले होते. या प्रवासात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. जीवनातील अनेक चढ-उतार, ताणतणाव प्रसंग त्यांनी विशद केले. सर्वांना बरोबर घेऊन काम केले व प्रामाणिकपणे शासनाची सेवा केल्याचे समाधान असल्याचे व्यक्त करताना भावनिक प्रसंगावर बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. उपस्थितांनी त्यांना पुढील निरोगी व सुखी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.