• Thu. Jul 31st, 2025

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उपअभियंता प्रल्हाद पाठक यांचा गौरव झाल्याबद्दल सत्कार

ByMirror

Jun 10, 2025

100 दिवस विशेष सुधारणा मोहिमेत उल्लेखनीय कार्य


पाठक यांनी आपल्या कार्यशैलीतून राज्यभर ठसा उमटविला -ए. एस. तारगे

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राबविण्यात आलेल्या 100 दिवस विशेष सुधारणा मोहिमेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग शेवगाव येथील उपअभियंता प्रल्हाद पाठक यांनी उल्लेखनीय कार्य करून राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत शासनाकडून त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


या सन्मानाबद्दल अहिल्यानगर विभागीय कार्यालयात प्रल्हाद पाठक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता ए. एस. तारगे, राहुरीचे उपअभियंता जावेद सय्यद, अभियंता सुधीर शिंदे, प्रथम लिपिक दिपक वाळके, प्रकाश थोरात, रियाज शेख तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उपकार्यकारी अभियंता ए. एस. तारगे म्हणाले की, प्रल्हाद पाठक यांनी आपल्या कार्यशैलीमधून केवळ कार्यालयीन कार्यच नव्हे, तर नागरिकाभिमुख दृष्टिकोन जपत बांधकाम विभागाच्या प्रतिमेत सकारात्मक बदल घडवून आणला आहे. त्यांनी केलेल्या प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि पारदर्शक कामाचे कौतुक करत तारगे यांनी पाठक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


उपअभियंता जावेद सय्यद यांनी प्रल्हाद पाठक यांचे काम हे केवळ निष्कलंकच नाही, तर नव्या पिढीच्या अभियंत्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारे असल्याचे स्पष्ट करुन त्यांचे अभिनंदन केले. प्रकाश थोरात यांनी अशा कार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे विभागाची विश्‍वासार्हता आणि जनतेशी जोडलेली नाळ मजबूत होते. त्यांचे कार्य सर्व विभागासाठी प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *