• Tue. Jul 29th, 2025

शहरात संत रविदास विकास केंद्र उभारणीसाठी निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान!

ByMirror

Jul 28, 2025

संत रविदास विकास केंद्राची इमारत पूर्ण, तर इतर कामे प्रगतीपथावर -संजय खामकर

नगर (प्रतिनिधी)- शहरात संत रविदास विकास केंद्र उभारणीसाठी निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चर्मकार विकास संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.


शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी आलेले उपमुख्यमंत्री ना. पवार यांचा सत्कार चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी केला. यावेळी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, शहर जिल्हाध्यक्ष विनोद कांबळे, युवा गटई अध्यक्ष रुपेश लोखंडे, दिनेश देवरे आदी उपस्थित होते.


अहिल्यानगर शहरात संत रविदास विकास केंद्रासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून 1 एकर जागेत उभारणी करण्यासाठी 1 कोटी रुपये निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला होता. प्रभाग 1 मधील कॉटेज कॉर्नर येथे संत रविदास विकास केंद्राची इमारत पूर्ण झाली असून, इतर कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती संजय खामकर यांनी दिली. निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य राहिल्याबद्दल त्यांचे समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *