• Thu. Jan 29th, 2026

भिंगारमध्ये उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यासह विमान दुर्घटनेतील कॅप्टन व कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली

ByMirror

Jan 29, 2026

भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये नागरिकांची मोठी उपस्थिती; वातावरण झाले भावूक


उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वसामान्य जनतेचा आवाज होते -संजय सपकाळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विमान दुर्घटनेत निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ही श्रद्धांजली सभा भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे पार पडली. यावेळी ग्रुपचे सदस्य, नागरिक, ज्येष्ठ मंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅप्टन शांभवी पाठक, कॅप्टन सुमित कपूर, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी व सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचे दुर्दैवी निधन झाले. सर्व दिवंगतांना उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकल्याची भावना व्यक्त केली.


या श्रद्धांजली सभेसाठी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, जहीर सय्यद, संजय भिंगारदिवे, सर्वेश सपकाळ, जियान सय्यद, मेजर दिलीप ठोकळ, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक व हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, जहीर सय्यद, संजय भिंगारदिवे, सर्वेश सपकाळ, जियान सय्यद, मेजर दिलीप ठोकळ, दिलीप गुगळे, अशोक पराते, दीपकराव धाडगे, दिनेश शहापूरकर, अभिजीत सपकाळ, मनोहर दरवडे, सदाशिव मांढरे, विलास आहेर, दीपक मेहतानी, दिपकराव घोडके, रतन मेहेत्रे, दीपक लिपाने, अविनाश जाधव, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, सुधीर कपाळे, सरदारसिंग परदेशी, प्रकाश देवळालीकर, इंजि. अनिलराव सोळसे, शंकरराव पंगुडवाले, सुंदरराव पाटील, शेषराव पालवे, रामनाथ गर्जे, कोंडीराम वाघस्कर, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, योगेश चौधरी, एकनाथ जगताप, तुषार घाडगे, राजू कांबळे, सूर्यकांत कटोरे, मुकेश मुथीयान, अजय खंडागळे, विकास निमसे, सखाराम अळकुटे, कुमार धतुरे, आसाराम बनसोडे, संतोष वीर, अमोल सकपाळ, अनिल शिरसाठ, दीपक अमृत, विशाल भामरे, देविदास गंडाळ, रवी ताठे, योगेश हळगावकर, मिलिंद भिंगारदिवे, संजय गवळी, सुहास देवराईकर आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर सर्वसामान्य जनतेचा आवाज होते. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाने एक कर्तृत्ववान नेतृत्व गमावले आहे. या दुर्दैवी विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांच्याच कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे स्पष्ट केले.


सचिन चोपडा म्हणाले की, “ही घटना अत्यंत वेदनादायक असून मन हेलावून टाकणारी आहे. अजित पवार यांनी आपल्या कार्यकाळात विकास, प्रशासन आणि लोककल्याणाला प्राधान्य दिले. कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या वैमानिक व कर्मचाऱ्यांचा त्याग देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील.”
ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे म्हणाले की, जीवन क्षणभंगुर आहे, हे अशा घटनांमधून पुन्हा एकदा अधोरेखित होते. दिवंगत आत्म्यांना ईश्‍वर सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना आहे. दुःखाच्या या क्षणी समाजाने एकत्र येऊन संवेदनशीलतेचा परिचय देणे गरजेचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *