• Tue. Nov 4th, 2025

श्री तुळजाभवानी देवीच्या पालखीचे सीमोल्लंघन सोहळ्यासाठी तुळजापूरकडे प्रस्थान

ByMirror

Sep 21, 2024

माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते पालखीचे पूजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची पालखी राहुरी येथून सीमोल्लंघन सोहळ्यासाठी शुक्रवारी (दि. 20 सप्टेंबर) श्री तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान करण्यात आले. माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते तुळजाभवानी देवीच्या पालखीचे पूजन व आरती करण्यात आली.


यावेळी पालखीचे मुख्य पुजारी व मानकारी सागर भगत, सुदाम भगत, ज्ञानेश्‍वर भगत, शिवराम भगत, दीपक भगत, देविदास भगत, संदीप भगत, निलेश भगत, मंगेश भगत, वसंत भगत, महेंद्र भगत, निखिल भगत, विशाल भगत, ओम भगत, तेली समाजाचे अध्यक्ष संजय पन्हाळे, सुरेश धोत्रे, भाऊसाहेब इंगळे, चाचा तनपुरे, आणा शेटे, गणेश खैरे, सुरेश बानकर, नारायण घोंगडे, विक्रम तांबे, बाळूनाना बानकर, शरद येवले, सचिन मेहेत्रे, सुभाष वराळे, उमेश शेळके, विक्रम भुजाडी, सुजय काळे, मकरंद कुलकर्णी, किरण भालेकर आदींसह भाविक उपस्थित होते.


देवीच्या सीमोल्लंघन सोहळ्यासाठी पालखी तयार करण्याचा व आणण्यासाठी अनेक समाजाचा मान आहे. दरवर्षी पालखीसाठी लागणारे उभे लाकूड माळी, मेहेतर इतर कामासाठी सागवान व बोरीचे लाकूड पालखीचे पटेल गायत्री सॉमिलकडून घेतले जाते. खांद्यासाठी जो मोठा दांडा लागतो तो पूर्वीपासून जुनाच वापरला जातो. संपूर्ण लाकूड गोळा झाल्यानंतर ती पालखी तयार करण्याचा मान कै. उमाकांत सुतार घराण्याकडे असून, सध्या त्यांचे वंशज अरुण सुतार हे मानकारी आहेत. लाकडाची कताई करण्याचे काम धनगर समाजाचे भांड घराणे तर खिळे पट्टी करण्याचे काम हे लोहार समाजाचे रणसिंग घराण्याकडे आहे. संपूर्ण पालखी तयार झाल्यावर खन नारळांनी पालखीची ओटी भरून भंडारा उधळण करुण आई राजा उदो उदो! च्या जय घोषात पालखी राहुरी येथून तुळजापूरला रवाना करण्यात येते.


तुळजापूर येथील शुक्रवार पेठेत पलंग पालखी कट्टयावरती जानकोजी भगत यांच्या समाधी शेजारी आणण्यात येते तेथे पलंग पालखीचे पूजन झाल्यानंतर मंदिर संस्थानकडून मनाचा एक रुपया व नारळ देऊन सीमोल्लंघनासाठी आमंत्रण देण्यात येते. ही पालखी वाजत-गाजत साधारण पहाटे 4 वाजे पर्यंत मंदिरात येते व या पालखीत देवीचा सीमोल्लंघन सोहळा पार पडतो, अशी माहिती पालखीचे मुख्य पुजारी व मानकारी सागर भगत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *