जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- सहा महिन्यात खूनाचा प्रयत्न करण्याचे तीन गंभीर गुन्हे असलेल्या व कोठला झोपडपट्टीत दहशत पसरविणाऱ्या आरोपीला अटक करुन एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी किशोर साळवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात साळवे यांनी म्हंटले आहे की, मुकुंदनगर येथे राहणारा असद गफ्फार शेख याच्यावर सहा महिन्यात तीन वेळा खूनाचा प्रयत्न करण्याचे कलम 307 अन्वये गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र त्याला अद्याप अटक झालेली नाही. सदर युवक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, कोठला झोपडपट्टी परिसरात दहशत पसरवीत आहे. त्यांच्या वडिलांचे कोठला येथे अवैध धंदे असून, तो गरीब लोकांवर अन्याय अत्याचार करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गंभीर गुन्हे करुन देखील तो परिसरात राजरोसपणे फिरुन दहशत पसरवित आहे. त्याच्यामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता असून, पोलीस प्रशासनाने असद शेख याला त्वरित अटक करून एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी साळवे यांनी केली आहे.