• Tue. Jul 22nd, 2025

शिर्डीसाठी कनेक्टिंग रेल्वे लाईन टाकण्याची मागणी

ByMirror

Nov 5, 2023

हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत यांचे रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांना निवेदन

उत्तरेतून किंवा दक्षिणेकडे येणाऱ्या, जाणाऱ्या साईभक्त व प्रवाश्‍यांची होणार सोय

अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तरेतून आणी दक्षिणेकडे येणाऱ्या, जाणाऱ्या साईभक्त व प्रवाश्‍यांची सोय होण्यासाठी शिर्डी-कोपरगाव किंवा कानेगाव किंवा चितली पर्यंत नवीत रेल्वे लाईन करण्याची मागणीचे निवेदन हरजितसिंह वधवा यांनी रेल्वेचे सोलापूर विभागाचे प्रभंधक नीरज कुमार दोहरे यांना दिले.

यावेळी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक एन.के. रनयेवले, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ परिचारक प्रदीप हिरदे, अहमद फैज, डीएसपी दीपक कुमार आझाद, सुदर्शन देशपांडे, सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रशांत मुनोत, गोपाल मणियार, राहुल मुथा, संदीप गोंदकर, विकास देशपांडे आदी आदी उपस्थित होते.


सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीनंतर वधवा यांनी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक दोहरे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शिर्डीला पुणतांबा येथून जावे लागते. पुन्हा येताना तोच मार्ग आहे. शिर्डी हून चितली, कानेगाव, किंवा कोपरगाव किंवा रोटेगाव येथे नवीन रेल्वे लाईन केल्यास उत्तरेतून दक्षिणेकडे आणि दक्षिणेतून उतेरेकडे जाताना शिर्डी येथे लांब पल्ल्यांच्या गाड्या शिर्डी पास करू शकतील. शिर्डी हा अंतिम स्थानक न राहता पुढे गाड्या जाऊ शकणार आहेत.

आजच्या परिस्थितीला शिर्डी हे अंतिम स्थानक असल्याने फक्त शिर्डीकडे जाणारे भाविकच तिथे येतात. नवीन कनेक्टिंग रेल्वे लाईन टाकल्यास लांब पल्ल्यांच्या गाड्यांना शिर्डी येथे थांबा मिळून इतर ठिकाणाहून भाविक व प्रवाश्‍यांची सोय होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *