राशीनच्या घटनेचा फुले ब्रिगेडच्या वतीने निषेध
अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- राशीन (ता. कर्जत) येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या नावाच्या पाट्यांची व सर्कली तोडफोड करुन विटंबना केल्याचा निषेध फुले ब्रिगेडच्या वतीने शहरात करण्यात आले. तर या प्रकरणातील समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना देण्यात आले.
याप्रसंगी शहराध्यक्ष दीपक खेडकर, राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, किरण जावळे, विक्रांत शिरसाठ, शुभम दळवी, निखिल ताठे, आशिष भगत, विक्रम बोरुडे, सुरज उमाप, सुरेंद्र सिंग, अनुराग पडोळे, प्रकाश वारमोडे, ब्रिजेश ताठे, महेश सुडके, किरण पंधाडे, संकेत लोंढे, संकेत खरपुडे, प्रसाद बनकर, आशिष भगत, ऋषीकेश ताठे, संतोष हजारे, विलास शिंदे, वसंत गाडगे, रेणुका पुंड, रमेश बनकर, विकास पटेकर, महेश गाडे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे नाव व चौक सुशोभीकरण व भगवा झेंडा असे ठरले असताना सदर सर्कलचे काम पूर्ण झाल्यानंतर चौकाच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या होत्या. तेथे अचानक शंभर ते दोनशे लोकांच्या जमावाने एकत्र येऊन क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या नावाच्या पाट्या काढल्या व त्याची तोडफोड करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेतील समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी. अन्यथा शहरात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा फुले ब्रिगेडच्या वतीने दीपक खेडकर यांनी दिला आहे.