मत्स्य व्यावसायिक कोल्हे यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव
वारंवार धमक्या देऊन दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- फ्लॅटच्या व्यवहारात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचा राग धरुन सर्व कामाचे व्यवहार पाहणाऱ्या व्यक्तीला वारंवार धमक्या देणाऱ्या शहरातील त्या माजी नगरसेवकावर कारवाई करुन पोलीस संरक्षण देण्याची मागणी मत्स्य व्यावसायिक सूर्यकांत कोल्हे यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील सूर्यकांत कोल्हे मत्स्य व्यवसायानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे. जिल्ह्यातील कामकाज व व्यवहार त्यांचे सहकारी राकेश हराळे (रा. नेहरू मार्केट, भराड गल्ली) पाहत आहे. शहरात गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी संजय झिंजे व त्यांचे इतर साथीदारांसह एका फ्लॅटचा व्यवहार करून खरेदी घेतली होती. परंतु त्यामध्ये फसवणुक झाल्याने अहमदनगर येथील न्यायालयात फिर्याद दाखल करून संजय झिंजे व त्यांच्या साथीदारावर कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा खटला न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मात्र हा गुन्हा दाखल केल्याचा राग धरुन झिंजे वारंवार शहरातील सहकारी मित्र राकेश हराळे व त्यांच्या मार्फत मला किरण काळे यांचे नाव घेऊन धमक्या देत असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.
पंधरा वीस दिवसापूर्वी झिंजे यांनी हराळे यांना धमकावून कोल्हे यांना समजावून सांगण्याची ताकिद दिली. हराळे यांनी हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांना धीर देऊन शांत राहण्याचे सांगितले. परंतु झिंजे त्यांना कायमच काही ना काही कारणावरून त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. 8 जानेवारी रोजी सायंकाळी चितळे रोड येथे हराळे त्यांच्या कामानिमित्त जात असताना, परत एकदा झिंजे यांनी त्या फ्लॅट प्रकरणातील गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी धमकावले. वारंवार झिंजे यांच्याकडून धमक्या मिळत असताना मला व माझ्या सहकारी यांना शहरात फिरणे अवघड झाले असून, झिंजे यांच्या दहशतीखाली वावरत असल्याचे निवेदनात त्यांनी म्हंटले आहे.
वारंवार मला व माझ्या सहकारीस धमक्या देणाऱ्या माजी नगरसेवक असलेल्या संजय झिंजे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कोल्हे यांनी केली आहे.