• Thu. Nov 13th, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीझाल्याबद्दल दादाभाऊ कळमकर यांचा सत्कार

ByMirror

Nov 6, 2025

कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा नव्या उमेदीने पक्ष बांधणीची सुरूवात -संजय झिंजे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी दादाभाऊ कळमकर यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे, उद्योजक शरद मडूर, प्रा. एल. बी. म्हस्के, धनंजय देशमुख, सुभाषराव बर्वे, बाबासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


माजी नगरसेवक संजय झिंजे म्हणाले की, दादाभाऊ कळमकर हे पक्षाचे अनुभवी, संयमी आणि जनतेशी जोडलेले नेते आहेत. त्यांनी 1997 ते 2009 या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी नेतृत्व केले. त्यांच्या जनसंपर्कामुळे आणि कार्यक्षमतेमुळे पक्षाने जिल्ह्यात मजबूत पाय रोवले. आता पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षात नवचैतन्य निर्माण होईल. कळमकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्‍वासू सहकारी मानले जातात. त्यांच्या एकनिष्ठ कार्यशैलीमुळे आणि सर्वत्र असलेला जनसंपर्काने पक्षाला बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.


उपस्थितांनी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून कळमकर यांची ओळख असून, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची घडी बसविण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहणार असल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला येत्या काळात नवी दिशा आणि बळ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *