• Tue. Jul 1st, 2025

बदलीसाठी परित्यक्ता असल्याची खोटी नोटरी करून घेणाऱ्या महिला शिक्षकांवर गुन्हे दाखल व्हावे

ByMirror

Mar 28, 2025

रिपाईचे ग्रामविकास मंत्री यांना निवेदन

नगर (प्रतिनिधी)- परित्यक्ता या सवलतीकरिता नोटरी करून संवर्ग एक मध्ये बदलीचा लाभ घेतलेल्या व सध्या बदली करिता फक्त नोटरी करून परित्यक्ता चा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या सर्व महिला शिक्षकांची सत्यता तपासावी व नोटरी करून खोटी माहिती देऊन, लाभ घेणाऱ्या महिला शिक्षकांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आली आहे. रिपाईचे ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देऊन सदर प्रकरणी चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक महिला शिक्षकांनी परित्यक्ता या सबबी खाली सूट मिळवली आहे. बदली करिता सोपा पर्याय म्हणून हा मार्ग सर्रास निवडला जात आहे. आता होणाऱ्या बदल्यांकरिता मोठ्या प्रमाणात अनेक शिक्षकांनी खोट्या नोटरी करून दिल्या असून, या सर्वांची चौकशी करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


बदली लाभाकरिता परित्यक्ता असल्याचे वकील मार्फत पैसे देऊन खोटी माहिती देऊन नोटरी केली आहे. परित्यक्ता म्हणून बदलीसाठी लाभ घेणाऱ्या अनेक शिक्षका बदलीसाठी या सवलतीचा वापर करतात. परंतु पतीने सोडून दिले आहे असे दाखवतात. मात्र प्रत्यक्षात त्या पतीबरोबर राहतात. पैशांची देवाण-घेवाण होते. अनेकदा सोबत सहलीला जातात.

अनेकांचे बँक खाते ही पत्नीच्या नावानेच आहे. तसेच सर्व परित्यक्ता महिला शिक्षकांची चौकशी व्हावी, यासाठी स्वतंत्र टीम तयार करून त्यांची शहानिशा व्हावी, अशा प्रकारे शासनाची फसवणूक होत असल्याने संवर्ग एक मधील खऱ्या परित्यक्ता महिलांना (कोर्टाकडून अधिकृत) वंचित रहावे लागते. खऱ्याचे लाभ खोटे घेत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
याप्रकरणी निपक्षपातीपणे चौकशी करून व कागदपत्र तपासून फक्त नोटरी वर बदलीकरिता सवलत घेण्यासाठी अर्ज केलेले, व सवलत घेतलेल्या दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावे, बदलीसाठी परित्यक्ता सवलतीचा लाभ घेणाऱ्यांच्या सेवा पुस्तकात नोंदी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *