• Sat. Oct 25th, 2025

शेवगाव येथील गट नंबर 683 वर न्यायालयाचा मनाई हुकूम

ByMirror

Aug 19, 2025

55 लाख रुपयांच्या देणी वसुलीसाठी दाखल दाव्याअंतर्गत महत्त्वाचा निर्णय


कोणतेही हस्तांतरण वा फेरबदल करण्यास मज्जाव

नगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील गट नंबर 683 या शेती मालमत्तेसंदर्भात अहमदनगर जिल्हा न्यायालयाने मनाई हुकूम दिला आहे. या प्रकरणी अल्ताफ ताजुद्दीन इनामदार यांनी ताहेर सीराजुद्दीन पटेल यांच्याकडून 55 लाख रुपये वसुलीसाठी विशेष दिवाणी दावा दाखल केला होता.


पूर्वी दाखल असलेल्या विशेष दिवाणी दावा क्र. 37/2023 मध्ये झालेल्या तडजोडीनुसार ताहेर पटेल यांनी वादी अल्ताफ इनामदार यांना रुपये 55,00,000/- देणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी ती रक्कम न दिल्यामुळे वादीस न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. याच अनुषंगाने वादीने विशेष दिवाणी दावा क्र. 114/2025 अहमदनगर येथील माननीय 12 वे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री. व्ही.व्ही. कुलकर्णी यांच्या न्यायालयात दाखल केला.


दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान वादी व प्रतिवादी यांच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने वादीचा मनाई हुकूम अर्ज मंजूर केला. त्यानुसार प्रतिवादी ताहेर पटेल अथवा त्यांच्या वतीने कोणीही व्यक्ती मौजे शेवगाव येथील गट नंबर 683, क्षेत्र 5 हेक्टर 11 आर या मालमत्तेबाबत कोणतेही त्रस्त हित निर्माण करू शकणार नाहीत किंवा फेरबदल करू शकणार नाहीत, असा आदेश दिला आहे. हा आदेश दाव्याच्या अंतिम निकाल लागेपर्यंत लागू राहणार आहे.


या प्रकरणी वादी अल्ताफ इनामदार यांच्या वतीने न्यायालयात ॲड. हाजी रफिक निजामभाई बेग यांनी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. रियाज आर. बेग, ॲड. आयाज आर. बेग व फैजान बेग यांनी सहकार्य केले. अखेरीस न्यायालयाने वादीच्या बाजूने मनाई हुकूम मंजूर करत प्रतिवादीस जमिनीवरील कोणतीही कारवाई करण्यास प्रतिबंध घातला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *