हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या पाठपुराव्याला यश; आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून कामाचे भूमिपूजन
रौप्य महोत्सवी वर्षात आरोग्यदायी उपक्रमांना गती
नगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये योग व प्राणायामासाठी उभारल्या जाणाऱ्या स्टेज व शेडच्या कामाचे भूमिपूजन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून 12 लाख 60 हजार रुपयांच्या खर्चातून होणाऱ्या या कामाच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते.
छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे व हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या शेड उभारणीमागे हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सातत्यपूर्ण पाठपुरावा असून, या शेडमुळे नागरिकांना पावसात व उन्हातही नियमित योग व प्राणायाम करता येणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी रतनशेठ मेहेत्रे, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, दिलीपराव ठोकळ, अभिजीत सपकाळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, महेश पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मन्नूशेठ झंवर, चुनीलाल झंवर, इंजि. गणेश भोसले, सचिनशेठ चोपडा, संजय भिंगारदिवे, विकास भिंगारदिवे, सुनील हळगावकर, सुनील शिंदे, अनिलराव सोळसे, जहीर सय्यद, सुधीर कपाळे, मनोहर दरवडे, दीपक घोडके, दिलीप गुगळे, ईवान सपकाळ, जमान मुजावर, अशोक पराते, सरदारसिंग परदेशी, अशोकराव लोंढे, शिरीषराव पोटे, अनिल हळगावकर, अविनाश जाधव, विलास आहेर, अविनाश पोतदार, प्रकाश देवळालीकर, शशिकांत पवार, ॲड. उद्धवराव चेमटे, सुहासराव देवराईकर, शेषराव पालवे, प्रशांत भिंगारदिवे, नामदेवराव जावळे, सिताराम परदेशी, बाळासाहेब झिंजे, नवनाथ खराडे, रामनाथ गर्जे, योगेश चौधरी, खान सर, रावसाहेब हंसे, देविदास गंडाळ, दशरथराव मुंडे, सचिन कस्तुरे, शिवांश शिंदे, कुमार धतुरे, सुवर्णाताई महागडे-भिंगारदिवे परदेशी ताई, कॉन्ट्रॅक्टर निखिल शिंदे, अनिकेत हळगावकर, ओंकार हळगावकर, बापूसाहेब निकत, विलासराव तोतरे आदींसह हरदिनचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विक्रांत मोरे म्हणाले की, उद्यानाचा कायापालट करण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. उद्यानातील विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. स्टेज व शेड उभारणीचे काम देखील या ग्रुपच्या पाठपुराव्याने आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मार्गी लागले आहे. ग्रुपच्या वतीने निरोगी आरोग्यासाठी सुरु असलेली आरोग्य चळवळ कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय सपकाळ यांनी ग्रुपच्या रौप्य महोत्सवी वर्षात हे कार्य पूर्ण होत असल्याचे समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, योग आणि प्राणायामासाठी आवश्यक असलेली भौतिक सुविधा उपलब्ध होत असल्याने ही आरोग्य चळवळ अधिक जोमात पुढे जाणार आहे. या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
प्रारंभी गौतम बुद्धांना अभिवादन करून परिसराची स्वच्छता करण्यात आली. सचिनशेठ चोपडा, संजय भिंगारदिवे व विकास भिंगारदिवे यांनी देखील हरदिनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरु असलेल्या विविध सामाजिक, आरोग्य व पर्यावरण रक्षणासाठी सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे यांनी केले तर आभार ओंकार हळगावकर व निखिल शिंदे यांनी मानले.