डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमी व उमंग फाऊंडेशनच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, मेजर रावसाहेब काळे, बाळासाहेब पाटोळे, उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिऱ्हे, रियाज कुरेशी, संदेश रपारिया आदी उपस्थित होते. तसेच यावेळी 26-11 मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ॲड. महेश शिंदे यांनी भारताचे संविधान हे एका समाजापुरते मर्यादित नसून, सर्व भारतीयांचे आहे. संविधानाने देशात मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला असून, संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली असल्याचे त्यांनी सांगितले.