प्रशासक पदाच्या माध्यमातून शहरात उत्तम कार्य होणार -एन.एम. पवळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिकेच्या प्रशासक पदाची सूत्रे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्वीकारली असता कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कास्ट्राईब राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांनी जावळे यांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्य उपाध्यक्ष वसंतराव थोरात, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव उपस्थित होते.
एन.एम. पवळे म्हणाले की, नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे प्रशासक पदाची सूत्रे आली आहे. जावळे यांनी यापूर्वी देखील महापालिकेत उपायुक्त म्हणून उत्तमपणे कार्य केले होते. प्रशासक पदाची सूत्रे मिळाल्यानंतर महापालिकेत त्यांच्या हातून उत्तम कार्य होणार आहे. तर नागरिकांना देखील मुलभूत सोयी-सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.