केडगावच्या विविध विकास कामासाठी खासदार विखे यांनी आठ ते नऊ कोटी रुपये निधी दिला -सचिन (आबा) कोतकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावच्या विविध विकास कामासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आठ ते नऊ कोटी रुपये निधी दिला. या निधीतून विविध विकासकामे सुरु आहेत. मनपाच्या माध्यमातून देखील दहा लाखाच्या आतील कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येत आहे. विकासकामाला सुरुवात झालेली असून, मागील विकासकामाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागणार असल्याची भावना उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांनी व्यक्त केली.
केडगाव येथील प्रभाग क्रमांक 16 मधील शाहूनगर परिसरात महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयी-सुविधा विकास योजनेतंर्गत माजी नगरसेवक सुनील (मामा) कोतकर व संदीपदादा कोतकर युवा मंचच्या पाठपुराव्याने तीन रस्त्यांच्या कामाचे शुभारंभप्रसंगी कोतकर बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सुनील (मामा) कोतकर, नगरसेवक मनोज कोतकर, जालिंदर कोतकर, आशोक कराळे, राजेंद्र कोतकर, संदीपदादा कोतकर युवा मंचचे अध्यक्ष भुषण गुंड, राहुल कांबळे, गणेश नन्नावरे, मंदाकिनी कावरे, रेणुका गुजर, कविता लबडे, शितल शिंदे, अर्चना वाघमारे, निलेश सातपुते, सचिन दारकुंडे, अमृत महाराज शिंदे, सागर सातपुते, जयदत्त खाकाळ, भाऊसाहेब ढाकणे, शशिकांत आठरे, पोपट कराळे, संतोष कोतकर, रोनित कोतकर, संकेत दिघे, सोनू कोतकर, गणेश कोतकर, महेश दळवी, अनिल भोर, संदीप भोर, मयुर खरात, महेश पवार, खरात, स्वाती गिराम, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे सचिन (आबा) कोतकर म्हणाले की, पाठपुरावा करून विकास कामे मार्गी लावली जात आहे. शहर विकासासाठी खासदार विखे यांनी 20 कोटी रुपये आणले असून, 2 कोटी केडगावच्या विकासकामासाठी घेण्यात आले आहे. केडगावात एक वर्षात 54 किलोमीटरचे रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. नागरिकांनी देखील काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे त्यांनी सांगितले.
माजी नगरसेवक सुनील (मामा) कोतकर म्हणाले की, राजकारणासाठी पिंड रक्तात असवा लागतो. माजी महापौर संदीप कोतकर यांच्याशी केडगावकरांचे वेगळे नाते जोडले गेलेले आहे. पुण्याला असताना देखील त्यांना केडगावच्या विकास कामाची काळजी असून, फोनवर देखील त्यांचा निधीसाठी पाठपुरावा सुरु असतो. त्याकाळी आमदार, खासदारांची साथ नसताना देखील अनेक अडचणींवर मात करुन त्यांनी केडगाव पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लावले. केडगावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवून त्यांनी घरापर्यंत पाणी पोहचवण्याचे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
जालिंदर कोतकर म्हणाले की, केडगावात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पालकमंत्री व खासदार यांच्या माध्यमातून मोठा निधी मिळाला असून, केडगावची प्रलंबित विकास कामे मार्गी लावली जात आहे. उर्वरित कामे देखील प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
