• Fri. Jun 6th, 2025

सत्ता असल्याने भरीव निधी मिळून प्रभागातील प्रलंबित विकास कामे मार्गी लागली -अनिल शिंदे

ByMirror

Mar 13, 2024

खासदार विखे यांच्या निधीतून कल्याण रोडच्या विद्या कॉलनीत सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाच वर्षाच्या कार्यकाळात शेवटच्या टप्प्यात विकास कामे होत आहे. पूर्वी सत्ता दुसऱ्यांच्या हातात होती, त्यामुळे निधी मिळण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. मात्र राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने भरीव निधी मिळाला व प्रभागातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यात आल्याचे नगरसेवक अनिक शिंदे यांनी सांगितले.


नगर-कल्याण रोड, प्रभाग क्रमांक 15 मधील विद्या कॉलनी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक शिंदे बोलत होते. याप्रसंगी माजी प्राचार्य खासेराव शितोळे, पारुनाथ ढोकळे, प्रा. भगवान काटे, बळवंत नागवडे, आशिष (मुन्ना) शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे, शिवसेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे, संतोष दसासे, प्रा. भानुदास जगताप, प्रा. उत्तमराव राजळे, भाऊसाहेब थोटे, अभय शेंडगे, गोरख गवळी, बाबासाहेब आंधळे, मोहनराव नागवडे, माणिक लगड, नामदेव गुंड, एकनाथ मोटे, विजय कदम, प्रा.महेबुब सय्यद, हिरामण गुंड, कुशाबा पिसे, रामदास दाते, परशुराम कोतकर, सचिन पवार, सागर गांधी, नितीन लबडे, रामदास अडसुरे, बाळासाहेब साळवे, अशोक गांगर्डे, प्रा. दिगंबर अहिरे, रामदास गायकवाड, बाबासाहेब महानवर, दत्तात्रय कानडे, सचिन ठाणगे, संतोष कोरडे, प्रशांत ठुबे, ज्ञानदेव आठरे, सुरेखा ढोकळे, वैशाली मोटे, सविता दावभट, मनीषा शितोळे, सुनंदा काशीद, सुनंदा थोटे, सिंधू बणगे, अरुणा काळे, जिजा कोरडे, सुप्रिया कोतकर, अश्‍विनी कांबळे, भाग्यश्री चव्हाण, सुनंदा सैद, ॲड. छाया दराडे, अंजली पाटील, सारिका ढगे, सोनाली लोटके, आरती तांदळे, नंदा सोनवणे, मिना सोनवणे आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


पुढे बोलताना नगरसेवक शिंदे म्हणाले की, भविष्यात महापालिका निवडणुकीत प्रभाग कसे राहणार? कोण मतदान करणार? याचा विचार न करता फक्त नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याच्या उद्देशाने विकास कामे मार्गी लावण्यात आली आहेत. प्रभागातील 18 रस्त्यांचे काम प्रस्तावित आहे. काहींचे वर्क ऑर्डर झाले असून, काहींचे वर्क ऑर्डर निघून आचारसंहितेपूर्वी काम सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


भगवान काटे म्हणाले की, प्रभागात विकासाबरोबर विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्यांना पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून अनिल शिंदे यांनी केले आहे. प्रभागात 50 ते 60 कोटी रुपये निधी आणून अनेक विकास कामांना चालना देण्याचे काम त्यांनी केल्याचे सांगितले.


प्रा. खासेराव शितोळे म्हणाले की, ज्यांच्याकडे प्रश्‍न सोडविण्याची क्षमता असते, त्यांच्याकडूनच नागरिकांच्या अपेक्षा असतात. नगरसेवक अनिल शिंदे यांनी नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करुन अनेक विकास कामे मार्गी लावले. त्यांच्याकडे निधी मिळवण्याचे व प्रलंबीत कामे मार्गी लावण्याचे कौशल्य असल्याचे, ते म्हणाले.


या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माजी प्राचार्य खासेराव शितोळे, राज्यस्तरीय उत्कृष्ट लेखापरीक्षा पुरस्कार मिळाल्याबद्दल परशुराम कोतकर, आयुर्वेदिक क्षेत्रात पीएचडी प्राप्त केल्याबद्दल डॉ. दत्तात्रेय लोंढे, येवला (जि. नाशिक) येथे आयटीआय कॉलेजमध्ये शिल्पनिर्देशक सहाय्यक प्राध्यापिकापदी नियुक्ती झाल्याबद्दल चैताली पिसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातारा येथे शिक्षिका म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल भाग्यश्री चव्हाण व सार्वजनिक बांधकाम विभागात इंजिनियर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अमोल दाते यांचा नगरसेवक शिंदे यांनी सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *