कामाचे नियोजन करुन प्रभागातील मुलभूत प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरु -सचिन जाधव
नगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते असताना शहराला मिळालेल्या भरघोस निधीतून आजही विकास कामे सुरु आहेत. या निधीतील 2 कोटी प्रभागातील विकास कामांसाठी खर्च करण्यात आला. कामाचे नियोजन करुन प्रभागातील सर्व मुलभूत प्रश्न सोडविण्याचे कार्य सातत्याने सुरु असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केले.
माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 10 मधील वंजार गल्ली येथे सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सचिन जाधव बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनिल क्षेत्रे, निसार जहागीरदार, सचिन पुप्पाल, इमरान शेख, बाळू पुप्पाल, अमिर खान, नीता कनोजिया, प्रशांत शिंदे, फरहान जहागीरदार, संगीता ससे, जुबेर शेख आदी उपस्थित होते.
पुढे जाधव म्हणाले की, प्रभागातील ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन व नंतर काँक्रिटीकरणाचा प्रश्न सोडविण्यात आलेला आहे. नागरिकांचा पैसा वाया जाणार नाही या दृष्टिकोनाने नियोजनात्मक काम प्रभागात सुरू आहे. अश्विनी जाधव यांच्या माध्यमातून प्रभागातील मुलभूत प्रश्न सोडविण्याचे काम सातत्याने सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुनिल क्षेत्रे म्हणाले की, स्थायी समितीच्या कार्यकाळात सचिन जाधव यांनी प्रभागातील विविध प्रश्न मार्गी लावले. समाज मंदिर पासून ते रस्त्याचे काम त्यांनी प्रामुख्याने करुन नागरिकांना सोयी-सुविधा निर्माण करुन देण्याचे काम त्यांनी केले असल्याचे सांगितले.
निसार जहागीरदार म्हणाले की, उत्कृष्ट नियोजन पद्धतीने सर्व प्रभागाचे काम करण्यात आलेले आहे. सामाजिक कार्यात योगदान देऊन जाधव दांम्पत्यांचे नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरु आहे. बारे इमाम येथे काँक्रिटीकरण करून देण्याचे काम देखील त्यांच्या माध्यमातून झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.