• Tue. Nov 4th, 2025

सांडवेच्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाच्या कामाला प्रारंभ

ByMirror

Oct 17, 2023

खासदार डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून प्रश्‍न मार्गी

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील सांडवे येथील अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या स्मशानभूमीचा प्रश्‍न खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला आहे. नुकतेच गावाचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे आजी-माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.


या भूमीपूजनप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक नेते विष्णू दादा खांदवे, बुऱ्हाण शेख, सरपंच प्रवीण उर्फ बापू खांदवे, परशुराम घोलप, अमोल निक्रड, त्रिंबक आरु, जैनुद्दीन शेख, आवडाजी करांडे, भाऊसाहेब खांदवे, सखाराम बेद्रे, ठेकेदार राजेंद्र नंनवरे, निसार शेख, अतुल पवार, संकेत जगताप, सतीश शिंदे, इंद्रजीत खांदवे, श्रीकांत खांदवे, मनोज करांडे, रंगनाथ करांडे, मनोहर खांदवे, सर्जेराव शिंदे, समीर शेख आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सांडवे गावात असलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्मशानभूमीची दुरावस्था दूर करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने खासदार विखे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांनी तातडीने दखल घेऊन ग्रामस्थांचा हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला. तर स्मशानभूमीचे रूप पालटण्यासाठी काम सुरु करण्यात आले असून, दर्जेदार कामाने ग्रामस्थांचा स्मशानभूमीच्या दुरावस्थेचा प्रश्‍न कायमचा निकाली लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *