तर जिल्हा सेक्रेटरीपदी कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, कार्याध्यक्षपदी कॉ. सुरेश पानसरे
आशा वर्कर व गट प्रवर्तकांच्या प्रश्नावर लढा उभारण्याचा निर्धार
नगर (प्रतिनिधी)- आयटक संलग्न आरोग्य खाते आशा वर्कर संघटनेची 14 वी वार्षिक बैठक बुरुडगाव रोड येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत आशा, गट प्रवर्तकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करुन तीव्र लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला.
सुवर्णा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध 8 विषयावर चर्चा करण्यात आली. राज्य आरोग्य आशा व गट प्रवर्तक संलग्न आयटकचे राज्य अधिवेशन गोंदिया येथे 26 व 27 एप्रिल रोजी असून, त्यामध्ये प्रतिनिधी पाठविण्याचे ठरले. आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांच्या कामावर आधारित मोबदला तसेच स्टेट फंड व केंद्र फंड दरमहा मिळत नसून 2 ते 3 महिने पेमेंट केले जात नाही. त्यामुळे कुटुंब कसे चालवायचे? हा प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत तीव्र लढा उभारण्याचे ठरविण्यात आले.
कॉ.ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, आशा वर्कर यांचे जिल्हाभर स्थानिक प्रश्न प्रलंबीत आहेत. ते सोडविण्यासाठी प्रशासनाकडे विनंती केली जाणार असून, त्याची दखल न घेतल्यास प्रचंड आशा मोर्चा जिल्हा परिषदेवर नेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच यावेळी ॲड. टोकेकर यांनी सर्व विषय व कामकाज संदर्भात चर्चा घडवून आणली.
या बैठकीत नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी कॉ. ॲड. सुभाष लांडे, कार्याध्यक्षपदी कॉ. सुरेश पानसरे, जिल्हा सेक्रेटरीपदी कॉ.ॲड. सुधीर टोकेकर, उपाध्यक्षपदी नाजीया पठाण, सविता धापटकर, यमुना बोरुडे, सहसेक्रेटरीपदी विद्या मुंढेकर, शोभा गायकवाड, राखी पुरोहित, खजिनदारपदी स्मिता ठोंबरे, जिल्हा मार्गदर्शकपदी सुवर्णा थोरात, जिल्हा संघटकपदी उषा अडांगळे, कार्यकारिणी सदस्यपदी शारदा काळे, स्वाती भणगे, उषा रोडे, स्वाती इंगळे, आशा मगर, आशा देशमुख, प्रतिभा काटमोरे यांची निवड करण्यात आली.