जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
होळकर यांनी सामाजिक कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली -संजय जपकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील आमदार निलेश लंके यांचे समर्थक शिवाजी किसन होळकर पाटील यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच संजय जपकर व सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी त्यांचा सत्कार करण्यात केला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, माजी मार्केट कमिटीचे संचालक वसंतराव पवार, माजी सरपंच दिलीपराव होळकर, उपसरपंच संजय जपकर, आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे नितीन कदम, ग्रामपंचायत सदस्य फारुख सय्यद, दादू चौगुले, किसन पतसंस्थेचे चेअरमन संपत कापसे, जालिंदर शिंदे, प्रा. एकनाथ होले, प्रा. बबन कांडेकर, गुलाब सय्यद, महादेव राऊत, पप्पू शेख, विजय राऊत, गोटीराम जपकर, आनंदा कांडेकर, जमीर सय्यद, राजू कर्पे, सत्तार सय्यद, जावीद सय्यद, निखिल जपकर, संतोष चव्हाण, अतुल जपकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपसरपंच संजय जपकर म्हणाले की, शिवाजी पाटील होळकर यांचे गावात विविध क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या राजकीय व सामाजिक कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी झालेली निवड गावाच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित प्रमुख वक्त्यांनी होळकर यांच्या कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना शिवाजी पाटील होळकर म्हणाले की, आमदार निलेश लंके यांच्या शिफारसमुळे जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गावाच्या विकासात्मक दृष्टीने नेहमीच कार्य केले. सर्वांना बरोबर घेऊन गावाच्या सर्वांगीन विकास साधण्यासाठी यापुढे देखील प्रयत्न राहणार आहे. ग्रामस्थांनी केलेला सत्कार हा सर्वात मोठा सन्मान असून, यामुळे आनखी चांगले कार्य करण्यास प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.