• Wed. Feb 18th, 2026

मोफत नाडी परिक्षण शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद

ByMirror

Jun 14, 2024

गरजूंसाठी शिबिर राबविल्याबद्दल शिवाजी जाधव यांचा सत्कार

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आयुशक्ती आणि आयडियल हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनच्या वतीने तारकपूर येथे विविध दुर्धर आजार बरे होण्यासाठी मोफत नाडी परिक्षण शिबिर घेऊन गरजूंवर उपचार करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.


अनेक गरजूंना शिबिराच्या माध्यमातून संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल शिबिराचे संयोजक सेवानिवृत्त एसटी कर्मचारी शिवाजीराव जाधव यांचा सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे यांनी सत्कार केला. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा निर्मला केदारी, सचिव संगिता साळवी, कांचन साळवी, नाडी तपासणीतज्ञ डॉ. कुणाल जाधव आदी उपस्थित होते.


बलभीम कुबडे म्हणाले की, संगमनेर आगारातून सेवानिवृत्त झालेले संघटनेचे जेष्ठ सभासद शिवाजीराव जाधव यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. अनाथ महिला, दुर्बल घटकातील बालके यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून अनाथ महिलासाठी शिवण क्लास, नर्सिंग कोर्स मोफत उपलब्ध करुन दिले आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे कार्य सुरु असून, गरजूंसाठी आरोग्य शिबिर घेऊन त्यांना आधार देत असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरात संधिवात, त्वचेच्या समस्या, लठ्ठपणा, गॅस आणि आम्लीपित्त संदर्भात तपासणी करुन मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात नागरिकांसह सेवानिवृत्त एसटी कर्मचारी देखील सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *