चित्रपट पहाण्यासाठी महिलांसह अबालवृद्धांची गर्दी
भावी पिढीला आपला इतिहास माहिती व्हावा -पै. महेश लोंढे
नगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड परिसरातील नागरिकांना नुकताच प्रदर्शित झालेला छावा सिनेमा दाखविण्यात आला. युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. चित्रपट पहाण्यासाठी महिलांसह अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती करुन चित्रपटाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी निलेश शिंदे, हरीभाऊ येलदंडी, शाम नळकांडे, सचिन ढेरे, प्रकाश कोटा, सविता कोटा, बबलू श्रीपाद, शूभम येमूल, आनीश सहानी, दीपक सहानी, वैभव आडेप, शेखर लिगंडे, गितेश कोडम, मनोज दोंता, आनुज कोडम, पवन टेकाळे, मनिष सहानी, किरण किते, आकाश शेंडकर, सचिन शेडकर, रोहन येमूल, यश येमूल, राहूल हसनाळे, रोशन सुरम, शुभम दोंता, महेश वल्लाकट्टी, नीशांत वल्लाकट्टी, ओमकार पवार आदींसह युवक उपस्थित होते.
चित्रपटाच्या विविध प्रसंगाने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या जय घोषानाने संपूर्ण परिसर दणाणला. शिवभक्तांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. अंगावर शहारे आणणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. चित्रपटासाठी उत्कृष्ट डॉल्बी साऊंड सिस्टिम व एलईडी वॉलची व्यवस्था करण्यात आली होती. चित्रपट सुरू असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य व मुघलांना दिलेली झुंज आदी प्रसंगाने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात संभाजी महाराजांचा जयघोष केला.
पै. महेश लोंढे यांनी भावी पिढीला आपला इतिहास माहिती व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा पराक्रम, संघर्ष आणि शौर्यातून प्रेरणा मिळण्यासाठी हा चित्रपट दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.