अभिनेते सयाजी शिंदे यांची उपस्थिती
बालकांनी धमाल करुन लुटला कार्यक्रमाचा आनंद
नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवनागापूर येथील साईराजनगरला मुलांसह बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या बालदिनासाठी प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांनी बालकांसह केक कापला. विविध कार्यक्रमाद्वारे बालकांनी धमाल करुन कार्यक्रमाचा आनंद लुटला. यावेळी परिसरातील बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बालदिनाच्या कार्यक्रमासाठी नवनागापूर ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब सप्रे, सागर सप्रे, नरेश शेळके, संजय भोर, उमेद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, सचिव सचिन साळवी, सल्लागार दीपक धिवर, सदस्य विजय लोंढे, रवी सुरेकर, रवी साखरे, प्रकाश भालेराव, संभाजी वायकर, सचिन मगर, अक्षय पाटील, सचिन गर्जे, प्रवीण ननवरे, विश्वास भोसले, हरिभाऊ दानवे, संदीप बनसोडे, विवेक पाटेकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, आजच्या बालकांमधून उद्याच्या सक्षम भारताचे भवितव्य घडणार आहे. बालकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी नागरिकांनी जबाबदारीची भूमिका घ्यावी. बालकांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन संस्थेच्या माध्यमातून महिला, बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मुलांना चॉकलेट व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पोवाडे, भाषण सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी वायकर यांनी केले. आभार सचिन साळवी यांनी मानले.
