युवकांसह एमआयडीसीच्या कामगारांचा सहभाग
नवनागापूरच्या चौकात शिवस्मारक व शिवस्तंभ उभारण्याचा निर्णय
नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, नवनागापूर येथे युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून नवनागापूर येथे शिवस्मारक व शिवस्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नवनागापूर येथील ग्रामस्थ युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एमआयडीसीचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनागापूर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आरती करण्यात आली. यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, आकाश कातोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, सरपंच डॉ.बबनराव डोंगरे, शामराव पिंपळे, पै. दत्ता तापकिरे, शंकर शेळके, नरेश शेळके, सुनिल शेवाळे, दिपक गिते, विवेक घाडगे, अशोक शेळके, रघुनाथ दांगट, चंद्रभान डोंगरे, अर्जुन सोनवणे, अक्षय पिसे, अमित बारवकर, वैभव सुरवसे, गणेश राईते, अस्लम ईमानदार, राजू ढगे, सचिन कुलकर्णी, संतोष शेवाळे, स्वप्नील खराडे, नामदेव झेंडे, शशिकांत संसारे, प्रदिप दहातोंडे, अभिजीत सांबारे, रमेश शिंदे, राहुल जगधने, अजिनाथ शिरसाठ, फिरोज शेख, अमोल ठोकळ, महेश जाजगे, वैष्णव गलांडे, चैतन्य कोंबडे, अमोल मेहेत्रे, वसिम शेख, सचिन खेसे, सोमनाथ बारबोले, रामदास कोरडे, अविनाश कर्डिले, किसन तरटे, शिव गलांडे, भास्कर गव्हाणे, भरत दिंडे, अप्पासाहेब बोंबले, रविंद्र पाटील, बाबासाहेब गांगर्डे, महेश शेळके, तुषार शेवाळे, संतोष गायकवाड, महेश थोरवे, भानुदास कुरकुटे, संकेत जराड, नीलेश शेवाळे, नितीन खेसे, राहुल मेहरखांब, पोपट जगताप, अप्पासाहेब पानसंबळ, अमोल घुटे, सोमनाथ आंधळे, सिद्धनाथ पोकळे, इंजी. अन्वर शेख आदी उपस्थित होते.
सरपंच डॉ.बबनराव डोंगरे म्हणाले की, समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे जावे लागणार आहे. सातत्याने महाराजांच्या कार्याची व विचारांची प्रेरणा मिळण्यासाठी नवनागापूर येथे शिवस्मारक व शिवस्तंभ उभारले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे म्हणाले की, दरवर्षी युवा सेना, एमआयडीसी मधील कामगार नवनागापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने अशक्य असे स्वराज्याचे स्वप्न साकारले. सर्वांना समान न्याय देऊन आदर्श राज्य निर्माण केले. त्यांचे कार्य आजही सर्वांसाठी आदर्श असून, त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळण्यासाठी नवनागापूर येथे उभे राहणाऱ्या शिवस्मारक व शिवस्तंभासाठी सर्व परीने युवा सेनेचे योगदान राहणार आहे. ही वास्तू अधिक भव्य-दिव्य करण्यासाठी योगदान देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.