संदीप दादा कोतकर युवा मंच आणि संदीप व्यायाम शाळेने साकारला महाराजांच्या राजवाड्याचा आकर्षक देखावा
केडगावमध्ये जयंती उत्सवाबरोबर राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम कौतुकास्पद -धनश्रीताई विखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील भैरवनाथ पतसंस्थे समोर संदीप दादा कोतकर युवा मंच आणि संदीप व्यायाम शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. चौकात भव्य स्टेजवर राजवाड्याची सजावट करुन शिवाजी महाराजांची सिंहासनावरील आकर्षक मुर्ती अभिवादनासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी युवकांनी जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
प्रारंभी धनश्रीताई सुजय विखे पाटील आणि उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, जालिंदर कोतकर, संदीप दादा युवा मंचचे अध्यक्ष भूषण गुंड, भाऊ बारस्कर, माजी नगरसेविका लताताई शेळके, गौरीताई ननावरे, सविता अशोक कराळे, शकुंतला पवार, सुनिता कांबळे, राहुल कांबळे, सागर सातपुते, बापू सातपुते, गणेश सातपुते, गणेश नन्नवरे, नवसुपे महाराज, अजित पवार, सोमनाथ बनकर, सुरज शेळके, सोनू घेंबुड, सुमित लोंढे, अतुल दरंदले, राजू लोंढे, विक्रम वीरकर आदींसह परिसरातील व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनश्रीताई विखे यांनी संदीप दादा कोतकर युवा मंच आणि संदीप व्यायाम शाळेच्या माध्यमातून महापुरुषांच्या जयंती उत्सवाबरोबर राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून, संस्कृती जोपासून महापुरुषांचे विचार रुजविण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सचिन (आबा) कोतकर यांनी शिवजयंतीच्या केडगावच्या ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.