• Thu. Jan 1st, 2026

अशोक खरमाळे यांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर

ByMirror

Apr 27, 2024

सामाजिक व बँकिंग क्षेत्रातील कार्याचा सन्मान

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अशोक नामदेव खरमाळे यांना श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पाचव्या काव्य संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. या काव्य संमेलनात पाहुण्यांच्या हस्ते खरमाळे यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती काव्य संमेलनाचे आयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे व श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे यांनी दिली.


नांदगाव (ता. नगर) येथील अशोक खरमाळे यांचे विविध सामाजिक क्षेत्रात कार्य सुरु आहे. निस्वार्थ भावनेने ते सामाजिक कार्यात योगदान देत आहे. तर बँकिंग क्षेत्रात देखील त्यांचे उत्कृष्ट कार्य सुरु आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *