नगर तहसील कार्यालयासमोरील उपोषणात सहभाग
समाजाच्या आरक्षणासाठी भावना तीव्र असून, वेळ न लावता शासनाने निर्णय घ्यावा -संजय खामकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा जाहीर करण्यात आला. चर्मकार विकास संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नगर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणात सहभाग नोंदवून पाठिंब्याचे पत्र दिले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नगर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणात चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, रुपेश लोखंडे, रामदास सातपुते, दिलीप कांबळे, विनोद कांबळे, संतोष कांबळे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी शासनाने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण देऊन समाजातील बांधवांना न्याय द्यावा. समाजाच्या आरक्षणासाठी भावना तीव्र असून, वेळ न लावता निर्णय घेण्याचे स्पष्ट केले.