शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर चादर अर्पण
कविता, शायरी व मुशायराची रंगली जुगलबंदी; शहर स्थापनेपासूनच्या ऐतिहासिक घटनांना उजाळा
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) शहराचा 535 वा स्थापना दिवस बुधवारी (दि. 28 मे) उत्साहात साजरा करण्यात आला. नगरकरांच्या वतीने शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा येथील कबरीवर चादर अर्पण करण्यात आले. हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान, मखदूम एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटी, रहेमत सुलतान फाउंडेशन व अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी कविता, देशभक्तीवरील गीत, शायरी व मुशायराने बागरोजा येथे मैफल रंगली होती. राष्ट्रीय किर्तीच्या शायरा कमर सुरुर यांनी शायरी व मुशायरा सादर केला. एक लम्हा समझकर यू भूल जाना ना मुझे… सदिया जुडी हुई हे मेरे दास्तान से! ही शायरी अहमद बादशाह यांच्यावर सादर करण्यात आली. शायरी, कविता व मुशायराच्या जुगलबंदीचा आनंद उपस्थित नगरकारांनी लुटला.
या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानचे हाजी मन्सूरभाई शेख, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर, अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाचे अभिजीत वाघ, इतिहासाचे अभ्यासक भूषण देशमुख, उबेद शेख, भैरवनाथ वाकळे, पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम, डॉ. कमर सुरुर, संध्या मेढे, अन्सार सय्यद, आसिफ शेख, आर्किटेक फिरोज शेख, जुनेद शेख, नवेद शेख, अल्तमश जरीवाला, आसिफ खान, शफाकत सय्यद, सलीम सहारा, नईम सरदार, फिरोज शेख, अल्ताफ शेख, महबूब सय्यद, वाहिद शेख, अबुजर सय्यद, रमिझ शेख, मोसीन शेख, फैय्याज शेख, हमजा शेख आदींसह इतिहास प्रेमी, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूषण देशमुख यांनी शहर स्थापनेपासून ते आज पर्यंतच्या ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला. शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा हे नगरकरांचे वैभव असून, अहमद निजामशहाच्या दूरदृष्टीमुळे आपल्याला हे वैभवशाली शहर लाभल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगात फार कमी शहरे अशी आहे, ज्यांचा स्थापना दिवस माहिती आहे, त्यापैकी एक अहमदनगर शहर असून, संस्थापक अहमद निजाम शहा यांनी 28 मे 1490 रोजी वसविले. या कार्यक्रमातून शहराच्या वैभवशाली इतिहासाला उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उबेद शेख यांनी केले. आभार भैरवनाथ वाकळे यांनी मानले.