राज्यघटना प्रत्येक भारतीयांच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची दुवा ठरली -प्रा. अशोक डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टी जिल्हा कार्यकारणीच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सावेडी येथील सिव्हिल हडको, गणेश चौकात आपचे जिल्हा समन्वयक प्रा. अशोक डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रोहित गांधी, दिलीप घुले, ॲड. विद्या शिंदे, माजी नगरसेविका सरस्वती घुले, भरत खाकाळ, सुमेध क्षीरसागर, गणेश मारवाडे, संपत मोरे, रवी सातपुते, राजेंद्र कर्डिले, राजू सामलेटी, काकासाहेब शेळके, सिताराम खाकाळ, प्रकाश फराटे, प्रकाश वडवणीकर, शेखर पुजारी आदींसह महिला, विद्यार्थी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
प्रा. अशोक डोंगरे म्हणाले की, भारत देशाने 26 जानेवारीला राज्यघटनेचा स्विकार करुन प्रगतीपथाकडे वाटचाल केली. घटनेने सामान्यांना मिळालेला मतदानाच्या अधिकाराने लोकशाहीचे प्रगल्भ राष्ट्र म्हणून भारत जगासमोर आला. राज्यघटना प्रत्येक भारतीयांच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची दुवा ठरली आहे.
यामुळे समाजातील आर्थिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विषमता नष्ट झाली. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मान मिळाला. आज महिला देखील राजकारणासह प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द करत असून, लोकशाहीचे मुल्य जोपासून आम आदमी पार्टीची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.