आरक्षण मिळेपर्यंत युवकांचा आक्रोश शांत होणार नाही -पै. महेश लोंढे
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी शहरातील सकल मराठा समाजातील युवकांनी बुधवारी (दि.1 नोव्हेंबर) नालेगाव जवळील नेप्ती नाका चौकात नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करुन रस्त्यावर टायर पेटवले. जय भवानी जय शिवाजी…, एक मराठा लाख मराठा… अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला.
या आंदोलनात या आंदोलनात पै. महेश लोंढे, पै. मनोज लोंढे, मच्छिंद्रनाथ चौकटे, ओमकार लेंडकर, आकाश सोनवणे, सचिन ठाणगे, सिद्धेश झावरे, पै.पप्पू घोडके, निखिल परदेशी, योगेश चौधरी, विवेक सोनवणे, सोनू रोहकले, सर्वार्थ मुदगल, आदेश बचाटे, ओमरत्न भिगांरदिवे, सूरज पंचमुख, नवनाथ राठोड, दिपक सहानी, अक्षय चुकाटे, अमित चित्राल, कुमार ठाकूर, गणेश सोळे, सागर गीते, अक्षय कोकाटे, सुरज संदूपटला, सुरज शिंदे, महेश चव्हाण आदींसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्यासाठी संतप्त युवकांनी रास्ता रोकोचा आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदविला. रस्त्यावर टायर जाळून व ठिय्या मांडून काही वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. काही वेळ नगर-कल्याण महामार्गाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस प्रशासनाने आंदोलकांचे निवेदन स्वीकारून रस्ता मोकळा करून दिला.

पै. महेश लोंढे म्हणाले की, अखंड महाराष्ट्रात आरक्षणासाठी भगवे वादळ पेटले आहे. आरक्षण मिळेपर्यंत युवकांचा आक्रोश शांत होणार नाही. जरांगे पाटील यांना या उपोषणापूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. मोठा कालावधी देऊन देखील सरकारने शब्द पाळलेला नाही. मराठ्यांच्या मुलांची दयनीय अवस्था झालेली असून, आरक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.