• Thu. Oct 30th, 2025

भिंगारला बुध्द पौर्णिमा उत्साहात साजरी

ByMirror

May 23, 2024

भगवान गौतम बुध्दांच्या भव्य पुतळ्यावर फुलांचा वर्षाव; स्वच्छता अभियान

भगवान बुध्दांनी धम्मातून मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग दाखविला -संजय सपकाळ

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण जगाला दया, क्षमा व शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुध्द यांची जयंती म्हणजेच बुध्द पौर्णिमा हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जॉगिंग पार्कमधील तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या भव्य पुतळ्यावर उपस्थितांनी फुलांचा वर्षाव करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. तर जॉगिंग पार्कमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


प्रारंभी भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या प्रज्वलीत करुन व बुध्द वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. धम्ममित्र संजय भिंगारदिवे व दीपक अमृत यांनी वंदना घेतली. यावेळी बौद्ध ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दीपक अमृत, संजय भिंगारदिवे, सुनील ओहळ, उत्तम माळवे, दादा नगरे, डी.सी. तरकासे, हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सीए रवींद्र कटारिया, उद्योजक लॉरेन्स स्वामी, शामराव वाघस्कर, जालिंदर बोरुडे, भारतीताई कटारिया, सत्यशीला खराडे, मीनाताई परदेशी, आरती बोराडे, मनीषा शिंदे, जहीर सय्यद, सुमेश केदारे, दिलीप ठोकळ, सचिन चोपडा, दिलीप गुगळे, नामदेव जावळे, सर्वेश सपकाळ, चुनीलाल झंवर, किशोर भगवाने, अशोक पराते, दीपक धाडगे, मनोहर दरवडे, अभिजीत सपकाळ, अविनाश पोतदार, अविनाश जाधव, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर अनावडे, अशोक लोंढे, शिरीष पोटे, सुधीर कपाले, सुभाष पेंदूरकर, मुन्ना वाघस्कर, विनोद खोत, प्रकाश देवळालीकर, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, राजू शेख, राहुल अमृत, अनिल सोळसे, विशाल भामरे, प्रतीक अमृत, सदाशिव मांढरे आदी उपस्थित होते.


एकनाथ जगताप, सुभाष भारुड, अरविंद ब्राह्मणे व विकास भिंगारदिवे यांनी मनोगत व्यक्त करुन भगवान गौतम बुध्दांच्या विचारांची तत्वे सांगून जीवनात धम्माचा स्विकार करण्याचे आवाहन केले. संजय सपकाळ म्हणाले की, करुणा व अहिंसेचे ज्ञान देऊन भगवान गौतम बुध्दांनी मानवजातीला प्रकाशमार्ग दाखविला. धम्मातून मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी सांगितला. त्यांनी दिलेली नीतिसूत्रे क्षमा, शांती, त्याग, सेवा व समर्पण आदर्श जीवन जगण्यास प्रेरणा देत असल्याचे त्यांनी सांगितले.


धम्म मित्र दिपक अमृत म्हणाले की, भगवान गौतम बुध्दांनी संपूर्ण मानवजातीला माणुसकीचा संदेश दिला. धम्म आदर्श जीवन जगण्याचा मार्ग दाखवित. भगवान बुध्दांनी दिलेली पंचशीलची शिकवण अमलात आणल्यास जीवनात परिवर्तन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर धम्माच्या तत्त्वज्ञानाची माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी जॉगिंग पार्कची स्वच्छता केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरदारसिंग परदेशी, राजू कांबळे, सूर्यकांत कटोरे, महेश सरोदे, अजय खंडागळे, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, राम झिंजे, गोरख उबाळे, सुनील थोरात, मंगेश मोकळ, सुदर्शन भिंगारदिवे, प्रकाश भिंगारदिवे, सुनील कसबे, आनंद राठोड, भाऊसाहेब गुंजाळ, सखाराम अळकुटे, राजू परमार, केशवराव दवणे, दशरथ मुंडे, सुभाष त्रिमुखे, प्रविण भोसले, राहुल भिंगारदिवे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *