• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

प्रभाग 11 मध्ये भाजप-राष्ट्रवादी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

ByMirror

Jan 6, 2026
विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना साद

झारेकर गल्लीतील दत्त मंदिरापासून भाजप-राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराला सुरुवात


विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना साद

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. झारेकर गल्ली येथील श्री दत्त मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला.


या वेळी भाजपचे उमेदवार विकास वाघ (अ), दीप्ती गांधी (ब), सुभाष लोंढे (ड) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आशा डागवाले (क) यांच्यासह भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरात जयघोष करत प्रचाराची सुरुवात करण्यात आली.


भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रचाराला सुरुवात केली असून, प्रभागातील विकासकामे, निर्माण करण्यात आलेली नागरी सुविधा व पायाभूत सोयी-सुविधा या मुद्द्यांवर मतदारांना साद घातली जात आहे. उमेदवारांनी विकासाला साथ देऊन निवडणुकीत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी पॅनलच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.


सुभाष लोंढे म्हणाले की, प्रभाग क्रमांक 11 मध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली. हा विकासाचा प्रवाह अखंड राहण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना संधी देण्याची गरज आहे. नागरिकांच्या विश्‍वासावर उतरून पारदर्शक, स्वच्छ आणि लोकाभिमुख कारभार करणे हेच आमचे ध्येय आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुभवी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात विकासात्मक कार्य सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


किशोर डागवले म्हणाले की, “ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची लढाई आहे. भाजपराष्ट्रवादी पॅनल म्हणजे विकासाचा विश्‍वासार्ह पर्याय आहे. नागरिकांना आधुनिक सुविधा देणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *