अण्णाभाऊ साठे यांचे कार्य अलौकिक -ज्ञानदेव पांडुळे
नगर (प्रतिनिधी)- फक्त दीड दिवस शाळेत जाऊन ज्यांनी असंख्य पुस्तके लिहिली अण्णा भाऊ म्हणजे साहित्यातील चमत्कार आहे. अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या भिंगार येथील श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल आणि विश्व शंकर प्राथमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य रितूदीदी ॲबट, अनिल साळुंखे, सहाय्यक विभागीय अधिकारी तथा प्राचार्य प्रमोद तोरणे, पर्यवेक्षिका कविता शिंदे, मुख्याध्यापक नारायण अनभुले उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य अनिल साळुंखे यांनी आपल्या भाषणात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा दिला. शिक्षक प्रतिनिधी पाडे सरांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणामध्ये प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी संघर्षातून शिक्षण घेत असताना प्रामाणिकपणा कसा टिकवावा हे समजावून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनीही भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप अस्वर आणि क्रांती घायतडक यांनी केले. आभार मुख्याध्यापक नारायण अनभुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.