• Mon. Nov 3rd, 2025

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी उमेश गायकवाड यांची नियुक्ती

ByMirror

Aug 21, 2023

शासन-प्रशासन भ्रष्टाचारमुक्त करण्याचा संघटनेचा प्रयत्न -रघुनाथ आंबेडकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते उमेश नाना गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशान्वये प्रदेश उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी गायकवाड यांच्या नियुक्तीची घोषणा केली.


नवनिर्वाचित उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गायकवाड यांना आंबेडकर यांनी नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार केला. पानोली (ता. पारनेर) येथील असलेले उमेश गायकवाड यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यात काम करण्याची संधी संघटनेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.


युवकांच्या हातात संघटनेची धूरा देवून भ्रष्टाचार विरोधात व सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे. गायकवाड हे आपल्या कार्यातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यास कटिबध्द राहणार असल्याची आशा व्यक्त करुन भाऊसाहेब कांबळे यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


रघुनाथ आंबेडकर म्हणाले की, संघटनेची राज्यस्तरीय बैठक अहमदनगर शहरात भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, यामध्ये संघटनेची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. तर इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील केल्या जाणार आहेत. शासन-प्रशासन भ्रष्टाचारमुक्त करण्याचा संघटनेचा प्रयत्न असून, भ्रष्टाचारमुक्त भारत घडविण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


या निवडीचे स्वागत करुन राज्य सरचिटणीस अंबादास शिंदे, राज्य मुख्य सल्लागार प्रमुख ॲड. अरविंद अंबेटकर, राज्य संपर्क प्रमुख संतोष कांबळे, मुख्यकार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, राज्य संघटक प्रकाश खैरमोडे, राज्य युवाध्यक्ष भाऊसाहेब घोडके, कार्याध्यक्ष पै.अमोल सोळंके, राज्य महिलाध्यक्षा ॲड.शोभाताई बुध्दीवंत-सातपुते, मराठवाडा अध्यक्षा रुक्मीणीताई गिरी, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. मनिषा गुरव, अहमदनगर जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे, जिल्हा संपर्क प्रमुख अमोल बोरगे, जिल्हा कार्याध्यक्ष भानुदास साळवे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *